Share

‘कोणावरही विश्वास ठेऊ नका, कारण मीठही साखरेसारखं दिसतं,’ शेतकरी आंदोलनावर हरभजन सिंगचे ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

आता पुन्हा एकदा क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. हरभजनने शेतकरी आंदोलनाबाबत तीन दिवसात चार ट्विट आणि एवढीच रिट्विट केली आहेत.

पण गुरुवारी त्याने केलेलं ट्विट इशाऱ्याचा संदेश होता. सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या या वादात हरभजन सिंग आंदोलकांच्या बाजूने आहे. कोणत्याही व्यक्तीवर विचार करून विश्वास ठेवा, कारण मीठही साखरेसारखं दिसतं, असं हरभजन म्हणाला. या ट्विटमध्ये हरभजनने शेतकरी आंदोलन किंवा सरकारचं नाव घेतलं नाही.

हरभजनने याआधी 7 आणि 8 डिसेंबरला काही फोटो आणि व्हिडिओ रिट्विट केले होतं. यामध्ये शेतकरी मदतीसाठी बनवलेले शेल्टर होम, औषधांची पाकिटं दाखवण्यात आली होती. तर एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी वृद्ध माणसाचे पाय दाबत आहे. हरभजनने 8 आणि 9 डिसेंबरला ट्विट केलं, त्यात तो शेतकरीच हिंदूस्तान आहे आणि शेतकरी आमचा सन्मान आहे, असं म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment India Maharashtra Marathi News Mumbai Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या