मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नव्या गोष्टींचा उलघडा होतो आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ प्रकरणी अटक झाल्यानंतर चौकशीमध्ये अनेक नवीन नावे उघडकीस आली आहेत. यामध्ये अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिचेही नाव समोर आलं होत.
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला चौकशीसाठी बोलावलं होतं यादरम्यान, अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये चालवण्यात आल्या. याविरोधात रकुल प्रीत सिंगने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी रकुल प्रीतला न्याय देत चुकीची बातमी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ज्यांनी अमली पदार्थ प्रकरत रकुल प्रीतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व न्यूज चॅनेलला न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटीने खडसावलं आहे. त्याशिवाय, एका बड्या चॅनलला माफी मागण्यासही सांगण्यात आलं आहे. तसेच, ज्या व्हिडीओमध्ये रकुल प्रीतला चुकीचं दाखवण्यात आलं आहे, त्या सर्व व्हिडीओंना परत घेण्याची ताकीद दिली आहे.
रकुल प्रीतने त्यांच्याविरोधात दाखवण्यात आलेल्या बातम्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, रकुलच्या वकिलांनी तिचा पक्ष मांडताना सांगितलं, “रकुलविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, कुठलंही प्रकरण नाही, मात्र प्रसारमाध्यमांनी सतत त्यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या चालवल्या.”
“ज्या प्रसारमाध्यमांनी फेक न्यूज चालवली आहे, ते नॅशनल ब्रॉडकास्ट असोसिएशनचे सदस्या आहेत. त्यांनी जबाबदारीने वागायला हवं. या चॅनलमुळे रकुल प्रीतची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे आता न्यायालयालाच या प्रकरणी काहीतरी निर्णय घ्यायला हवा”, असं रकुल प्रीतच्या वकिलांनी म्हटलं. प्रसारमाध्यमांमध्ये रकुलची कुठलीही बातमी दाखवण्यावर बंदी आणावी अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- ‘आता फक्त ईडीने फोन केला तरी मी हजर होईन, समन्सची गरज नाही!’
- रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करा; काँग्रेसचा हल्लाबोल
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- ‘सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही म्हणूनच शरद पवारांच्या नावाची चर्चा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
