🕒 1 min read
पुणे : राज्यातल्या अनेक भागांत आज अचानक पावसाने हजरे लावली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ पाहायला मिळत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुण्यातही अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेत बाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांच्या डिक्शनरीत विश्वासघाताला चमत्कार म्हणतात’
- ‘दानवे म्हणतील,पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच पुण्यातील ‘त्या’गव्यास मारले’
- विराटच्या ‘पॅटरनिटी’ लीव्हला स्टिव्ह स्मिथचा पाठींबा
- शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : राष्ट्रवादी
- नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल : नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
