Share

‘राज-उद्धवचं सांगू नका ; माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय’- बच्चू कडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई हाय कोर्टाने दिला आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

यावर विरोधकांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आता महाविकास आघाडी सरकारमधी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘हायकोर्टाचा असा निर्णय येईल, असं वाटलं नव्हतं, अकरावीची सीईटी रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही.अकरावीच्या प्रवेशांना कुठेही अडचण येणार नाही, गरज पडल्यास जागांची संख्या वाढवू,’ असं बच्चू कडू म्हणाले.

तसेच एकाही मुलाला प्रवेश मिळला नाही असं होणार नाही, असंही ते म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या सीईटीचे शुल्क भरलं असेल ते त्याला परत मिळेल, तो त्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बच्चू कडू यांनी पालकांनी शासकीय शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं खासगी शाळेत शिकली यासंदर्भात विचरालं असता त्यांच्या मुलांचे मला सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!