औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून वाहन चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. शहरातील पोलिसांचा फौज फाटा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहे. जागोजागी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असताना देखील शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबता थांबेना. वाहनचोर चोरी करण्यासाठी एक दिवस देखील खाडा करत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान ते देत आहे.
अजय अशोक चौधरी (वय २४, रा.बकवालनगर, वाळूज) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएल-३६२८) चोरट्याने १८ मे रोजी एमआयडीसी वाळूज परिसरातील नुतन राजमुनी ट्रान्सपोर्टच्या मिडास्केअर कंपनीजवळून चोरून नेली.
प्रमोद गंगाधर कुलकर्णी (वय ६४, रा.ठाकरेनगर, सिडको एन-२) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एएम-८६४) चोरट्याने २० मे रोजी घराजवळून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे एमआयडीसी वाळूज आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

