परळी : गेल्या सात दिवसांपासून मराठवाड्यासह परळी परिसरात अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. परळी येथे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेसह जयंत पाटलांनी पूरस्थितीची शेतातील नुकसानीची पाहणी केली. त्यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून नुकसानीची पाहणी करु नका, असा टोला पंकजा मुंडे यांनी जयंत पाटील व धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर ते मराठवाड्याला न्याय देऊ शकतात. न्याय देण्यासाठी ते पाऊले उचलतील अशी मला अपेक्षा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. रस्त्याच्या कडेला उभे राहून नुकसानीची पाहणी करु नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, नुकतीच बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची बैठक घेतली आहे. जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे या जलसाठ्यात मोठी वाढ होईल, तसेच सिंचन क्षेत्रही वाढेल असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी धनंजय मुंडेही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू


