Share

“कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण…”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : अयोध्या दौऱ्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत असताना अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून चांगलेच घेरले आहे.

संजय राऊत म्हणाले,  “लोकशाहीत कोणी कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. कुणालाही सभा घेण्याची बंदी नाहीये. कुणाला कुठे सभा घ्यायची आहे त्यांना घेऊ द्या. कोणी बाळासाहेबांची कॉपी करत असेल तर काय करणार? आम्हाला भपका करावा लागत नाही. कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण करत असेल तर करू द्या. शिवसेना आपल्या ताकदीवर राजकारण करत आहे”, असा थेट टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.”

अयोध्येत जाण्याचा निर्णय शिवसेनेने केला, हा प्रश्न चुकीचा आहे. शिवसेना नेहमी अयोध्येत गेली आहे. आमचं अयोध्येशी नातं आहे. हा केवळ निवडणुकीचा भाग नाही. राजकीय षडयंत्र नाही. जेव्हापासून अयोध्येचं प्रकरण सुरू झालं तेव्हापासून शिवसेना आणि अयोध्येच भावनिक नातं आहे. श्रद्धेचं आहे. जेव्हा सरकार नव्हतं, तेव्हाही आम्ही जात होतो. महाराष्ट्रात सरकार झाल्यावर मुख्यमंत्री दोनदा अयोध्येला गेले असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

“कुणाला अयोध्येला जायचं ते जाऊ द्या. स्वच्छ मनाने जावं. राजकीय भावनेने जाऊ नका. राजकीय भावनेने जाणाऱ्यांना रामलल्ला मदत करत नाही”, असा टोलाही राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!