Share

VIDEO : अनसोल्ड झाल्यानंतर रैनाची बीसीसीआयला विनंती भावनिक होत म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्यांचं चिन्ना थाला असलेल्या सुरेश रैनाला संघात पुन्हा घेतले नव्हते. तसेच इतर संघांनीही रैनाच्या रस दाखवला नाही ज्यामुळे तो अनसोल्ड राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने रैनाला रिटेन केले नाही. दशकांहून अधिक काळ चेन्नईचा भाग असलेला रैना यावर्षी स्पर्धेचा भाग नसणार आहे. अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैनाने पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.

सुरेश रैनाचा तो भावनिक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात रैनाने बीसीसीआयला दुसऱ्या लीग मध्ये खेळून देण्याची कळवळीची विनंती केली आहे. तो या व्हिडिओत भावनिक होत म्हणाला “बीसीसीआयने आयसीसी किंवा फ्रँचायझींशी सल्लामसलत करून बीसीसीआय सोबत करार नसलेल्या खेळाडूंना परदेशात खेळण्याची परवानगी द्यावी. तुम्ही जर बीसीसीआयच्या करारातही नाही आहात, तुम्हाला आयपीएलमध्ये कोणी घेतलेले नाही, तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळत नाही, जी स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाही. आमच्या कडे प्लान बी नाहीये , त्यामुळे अशा खेळाडूंना बाहेरच्या लीगमध्ये खेळू द्यायला हवे.”

सुरेश रैनाला “मिस्टर आयपीएल” म्हणून ओळखले जायचे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. रैनाच्या २०५ सामन्यात एकूण ५५२८ धावा आहेत. यादरम्यान त्याने ३९ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर २०३ सिक्सर आणि ५०६ चौकार आहेत. रैनाने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्वही केले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा रैना लीगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने २८ विकेट्सही पटकावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!