Share

“शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका”, आ. लोणीकर आक्रमक

Published On: 

जालना: सध्या संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र याची कुठलीही पूर्वकल्पना शेतकऱ्यांना देण्यात आल नव्हती. मागील एक वर्षात एकही रुपायचं विकासकाम न करणारे हे सरकार वांझोटे असून आता शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे कनेक्शन तोडण्याचे काम करत आहेत, असा घणाघात करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जिल्ह्यातील नेर येथे आयोजित लाक्षणिक उपोषण प्रसंगी आ. लोणीकर बोलत होते. विद्यमान महावीकस आघाडी सरकारवर हल्लाबोल करत या सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय आणि अत्याचार सुरू केला आहे, ही बाब महाराष्ट्राच्या उज्वल इतिहासाला कालिमा फासणारी आहे, वसूली करणे क्रमप्राप्त नक्कीच आहे परंतु त्यासाठी हा पर्याय होऊ शकत नाही असे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मत आहे. शेती पंपाचे कनेक्शन तोंडल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल, असे मत त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कार्याची आठवण करून दिली. जालना व परतूर येथे २२० केव्ही, नेर येथे १३२ केव्ही यासह जिल्हाभरात ४९-३३ केव्ही मंजूर केल्या होत्या. परंतु हे वांझोटे सरकार कोणत्याही प्रकारचे विकासकाम करत नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!