Share

‘मोदीजी भाषण नको, माफी मागा;’ काँग्रेसची मागणी

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासोबतच, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यावरून तीव्र नाराजी होत असून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं.

मोदींच्या आजच्या संबोधनावर देखील विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. दुसऱ्या लाटेत ६२४ डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती IMA ने दिली आहे. यावरूनच काँग्रेसने ‘मोदीजी भाषण नको, माफी मागा’ अशी मागणी केली आहे. ‘तज्ञ सांगत असतानाही मोदी सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे कानाडोळा केला, लाखोंच्या सभा घेतल्या. परिणामी रुग्ण वाढले. या रुग्णांची सेवा करता करता कित्येक डॉक्टरांचे बळी गेले. याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार आहे!,’ अशी टीका काँग्रेसने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!