पुणे : उरवडे (ता. मुळशी) येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते. यापैकी ११ जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.
पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आगीत कंपनीतील ३७ पैकी १७ कामगार बेपत्ता असून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायजर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारी अचानक आग लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याचे समजते. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान आतमध्ये अडकलेल्या मध्ये काही महिला कामगारांचा समावेश असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली असून, पौड पोलीस आणि संबंधित यंत्रणा आग विझवीण्याचे प्रयत्न करत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामास येत असतात.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मोदींनी लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा केली; नवाब मलिकांचा दावा
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान


