Share

निर्बंधांत कोणतीही सवलत देवू नका; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत होताना दिसत असल्याने आता काही सवलती राज्य सरकार कडून दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रण प्रतिबंधांबाबतच्या निर्बंधांत कोणतीही सवलत न देण्याबाबतच्या सूचना राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. कोविड प्रतिबंधांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन सर्वांनी सक्तीनं केलं पाहिजे असं देखील केंद्र सरकारने म्हटले आहे.

कोरोना संक्रमित विभाग आणि पाच टक्क्यांहून अधिक कोरोना संक्रमण असलेल्या जिल्ह्यांतील लोकांना मोठ्या संख्येनं एकत्र येण्याबाबत परवानगी देऊ नये. राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असून त्याबाबतचे दिशानिर्देश जारी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. ज्या समारंभांत मोठ्या संख्येनं एकत्र यायला अगोदरच परवानगी दिली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे निर्देशही केंद्र सरकारनं दिले आहेत.

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 1 हजार 410 नवीन कोरोनाबाधित आढळले तर या आजारातून काल 1 हजार 520 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 64 लाख 35 हजार 439 झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97 पूर्णांक 46 शतांश टक्क्यांवर स्थिर आहे. कोविड-१९ मुळं काल राज्यात 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातला मृत्यू दरही 2 पूर्णांक 12 शतांश टक्क्यांवर स्थिर आहे. राज्यात सध्या 23 हजार 894 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात कालही सर्वाधिक म्हणजे 400 कोरोना नवबाधितांची नोंद झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!