Share

‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, तर त्यांचा लिंगच्छेद करून…; रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांची आक्रमक मागणी

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

14 वर्षीय मुलीवर गँगरेप झाल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात समोर आली आहे. बॉयफ्रेण्डने बलात्काराचं व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामधील 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं असून विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींना फाशी देऊ नका, तर त्यांचा लिंगच्छेद करून त्यांची गावागावात मिरवणूक काढा, अशी संतप्त मागणी रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींना दयामाया न दाखवता पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!