🕒 1 min read
मुंबई : गेले अनेक दिवस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण होणार ? यावरून तर्क लावले जात होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचीच निवड निश्चित झाली होती. यानंतर, हायकमांडने देखील त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आज नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांच्या भाषणात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाना साधला आहे.
“हा पदग्रहण सोहळा नाही तर शेतकऱ्यांचे अधिवेशन आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.आता चार्ज माझ्यकडे आहे त्यामुळे मोदिजी शेतकऱ्यांच्या वाटेला जाऊ नका. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. भविष्यात शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व मोठ्या हिम्मतिने उभे राहू, भाजपवाले ढोंगी आहेत जेव्हा राकेश टिकेत शेतकऱ्यांसाठी रडतात त्यावर टीका करतात, अन हे नटसम्राट राज्यसभेत रडतात त्याच काय ?” असा सवाल देखील नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.
“महाराष्ट्रातील एकही प्रॉपर्टी भाजपला विकू देणार नाही, त्यासाठी वेळ पडली तर काँग्रेस पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे. तसेच देशाला संपवण्याच काम मोदींनी मनात आणू नये. मी आज जो चार्ज घेतोय तो फक्त दिल्लीत बसलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारचा चार्ज काढण्यासाठी घेत आहे.” अशा प्रकारचा घणाघात कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर केला. यामुळे नाना पटोलेंच्या कार्यकाळात भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना जोरदार रंगणार एवढे मात्र नक्की आहे. आगामी काळात भाजपच्या वतीने याला कसे प्रतिउत्तर दिल जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- ‘शेतकऱ्यांपुढे इंग्रज टिकू शकले नव्हते, मग मोदी कोण लागून गेलेत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
