🕒 1 min read
मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. दरम्यान, आज कोर्टामध्ये सोमय्या यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतांना ‘सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका’, अशी मागणी मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केली नाही ना? सोमय्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असे मुंबई गुन्हे शाखेने आज कोर्टात सुनावणीदरम्यान म्हंटले आहे. तसेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टात उत्तरही सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, कोर्टामध्ये युक्तिवाद सुरु असतांना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सोमय्यांच्या बँक खात्यांचे तपशील हवेत, असे म्हंटले आहे. तसेच सोमय्यांचं १४० कोटी जमा करण्याचं टार्गेट होतं, अशी माहितीही यावेळी घरत यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर…”
- पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
- INS VIKRANT घोटाळा: किरीट सोमय्या गुजरातमध्ये असल्याची माहिती!
- राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
- “…हीच परंपरागत शिवसेनेची जागा मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला दिली”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
