मुंबई : रेमडेसिवीरचा गेमडिसीविर करू नका असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला.
‘कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये. कोरोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे,’ असं आठवले म्हणाले आहेत.
‘देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस, ऑक्सिजन आणि रेमडेसीवर सह सर्व औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करण्यात येत आहे.’ अशी भूमिका आठवले यांनी स्पष्ट केली आहे.
यासोबतच, ‘राज्य सरकार ने कोरोना च्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकार वर करू नये. मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे .कोरोना च्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे असा आरोप रामदास आठवले यांनी आज मुंबईत केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राऊतांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावी, मी आता राऊतांवर एक पुस्तक लिहितो’
- आम्ही रेमडेसिवीर पाकिस्तान किंवा चीनला देणार नव्हतो, तर…; चंद्रकांत पाटील कडाडले
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा


