Share

आम्ही रेमडेसिवीर पाकिस्तान किंवा चीनला देणार नव्हतो, तर…; चंद्रकांत पाटील कडाडले

Published On: 

पुणे : रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली. हे समजताच रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी देखील झाली होती. हे सर्व समोर येताच भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवस ही समस्या गंभीर होत आहे. अशातच राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या आरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘निरपराध माणसांना उचलून नेणं आम्ही सहन करणार नाही. विरोधी पक्षनेत्यांना मुख्यमंत्र्यांप्रमाणेच हक्क असतात. राज्याची यंत्रणा काय करत आहेत ? दरेकरांनी मंत्री शिंगणे यांना ५० हजार रेमडेसिवीर या कंपनीकडे असल्याची माहिती दिली होती. त्यांनी ऍडव्हान्स देण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर परवानगीनेच आम्ही ऍडव्हान्सची व्यवस्था केली. यामध्ये काय चुकलं ?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘आम्ही इंजेक्शन पाकिस्तान किंवा चीनला देणार नव्हतो. तर महाराष्ट्रातील जनतेलाच ते देणार आहोत. यात श्रेयाचा विषयच नाही. काल पासून एकही रेमदेसीवीर इंजेक्शन आलेलं नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मग राज्य सरकारची काय यंत्रणा आहे ? काय हालत केलीये महाराष्ट्राची ? आम्ही व्यवस्था करतोय मग लोकांना मदत करणं चुकीचं आहे का हे सांगावं ? ‘ असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!