यवतमाळ : काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आ.संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या काळी मीडियापासून दूर राहणारे राठोड आता कोरोना काळात सक्रिय झाले आहेत. कोरोना संसर्गासह मृतांची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आताच खबरदारी घेतली नाही, तर जिल्हा हाताबाहेर जाईल, असा इशारा आमदार संजय राठोड यांनी दिला.
आ.राठोड म्हणाले, जिल्ह्यात दररोज किमान १० हजार कोरोना चाचण्या करण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र, येथे प्रतिदिन चार हजार ५०० पेक्षाही कमी चाचण्या होत आहे. बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गांभीर्याने होणे गरजेचे आहे. ही यंत्रणा कुठेच कार्यान्वित नसल्याचा आरोप आमदार राठोड यांनी केला.
दररोज किमान एक हजार बाधित रुग्ण आढळत असून, २० ते २५ रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. सध्या बाधित व मृतांचा दर २५ टक्क्यांवर गेला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे ते बोलताना म्हणाले. प्रशासनही त्याबाबत उदासीन असल्याने कोरोनाने बाधित होणाऱ्या व मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या भयावह स्थितीत असू शकते, अशी चिंता संजय राठोड यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- भाजप नेत्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ.संजय गायकवाडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- पंजाबचा नादच खुळा!, अर्शदीप सिंगने केला ‘गब्बर’च्या स्टाईलमध्ये जल्लोश
- आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर! जालना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांचे हाल
- कृउबास सहसचिवास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक
- ‘गोकुळ’च्या निवडणुकांवर कोरोनाच सावट; निवडणुकीचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

