🕒 1 min read
नवी दिल्ली- भारतासह जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
सॅनोटाईज नेझल स्प्रे चाचणीमध्ये प्रभावी ठरल्याचं म्हटलं जात आहे. सॅनोटाईजच्या वापरानंतर कोरोनाबाधितांमधील विषाणूंचा प्रभाव 24 तासांमध्ये 95 टक्के आणि 72 तासांमध्ये 99 टक्के कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही क्लिनिकल चाचणी बायोटेक कंपनी सॅनोटाईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ब्रिटनच्या अॅशफूड अँड पीटर्स हॉस्पिटलनं केली आहे. शुक्रवारी या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.
या कंपनीने भारतातही मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच भारतातील हैदराबाद येथील भारत बायोटेक ही कंपनीही नेझल स्प्रे देशांतर्गत बाजारात उपलब्ध करणार आहे. भारत बायोटेकच्या नेझल स्प्रेची चाचणी महाराष्ट्रातील नागपूरसह हैदराबाद, पाटणा,चेन्नई येथे सुरू आहे अशी देखील माहिती समोर आली आहे.
‘सॅनोटाइज’ श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील विषाणूला मारुन टाकतो. तसेच फुफ्फुसात संसर्ग पसरु देत नाही. ‘नेझल स्प्रे’ उपचार पद्धत सुरक्षित असून ती प्रभावी आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग अगदी कमी कालावधीत रोखता येतो, , असाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येसंदर्भात नवनवीन उच्चांक स्थापित होण्याचं सत्र सुरूच आहे. काल संध्याकाळपर्यंत 68 हजार 631 नविन कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल 2 लाख 73 हजार 272 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या झाल्या हे लक्षात घेता चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण काल 24.56 टक्के होतं.
एका दिवसात 65 हजाराहून अधिक बाधितांची नोंद होण्याची गेल्या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे. कोविड 19 मुळे दगावणाऱ्या व्यक्तींची दैनंदिन संख्याही काल 500 च्या पुढे गेली. काल दिवसभरात 503 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. या रोगामुळे आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या 59 हजार 970 आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंजाबचा नादच खुळा!, अर्शदीप सिंगने केला ‘गब्बर’च्या स्टाईलमध्ये जल्लोश
- आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर! जालना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांचे हाल
- कृउबास सहसचिवास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक
- भाजप नेत्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ.संजय गायकवाडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘या’ जिल्ह्यात आज पासून ‘जनता कर्फ्यु’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

