Share

‘राऊतांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावी, मी आता राऊतांवर एक पुस्तक लिहितो’

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देशातील स्थिती युद्धजन्य झाली असून दोन दिवसांचे खास अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केली आहे. ‘देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी,’ असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

संजय राऊतांच्या या मागणीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना खोचक टोला लगावला आहे. ‘शरद पवारांवर पीएचडी, अजित पवारांवर एमफिल सुरु आहे. आता संजय राऊतांवर पुस्तक लिहितो. ते वर्णन करण्यापलीकडचे व्यक्तिमत्व आहेत. राऊतांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावी,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!