ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जुलैरोजी ठाण्यात मनसे सैनाकांशी संवाद साधत त्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असतील तर अजिबात करू नका, असे फर्मानच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहे.
ठाणे पालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच त्यांनी ठाणे दौरा केला. या दौऱ्यातच त्यांनी मनसे सैनिकांना प्रमुख ८ सूचना दिल्या आहेत.तसेच राज्यावर आलेल्या या आपत्तीला वाढत्या वस्त्या कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वस्त्यांना नियोजित आकार द्यावा हे कोणत्याही सरकारला वाटत नाही असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाना साधला.
दरम्यान राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना काही सूचना केल्या आहेत. समाज माध्यमांचा वापर कमी करने. तसेच स्थानिक पत्रकारांशी जवळीक साधून कार्यक्रमांची माहिती देण्यात यावी. एकमेकांशी जुडून राहणे. सोबतच प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात आले असून त्यावर नवीन पर्याय शोधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे पालिकेत १३० नगरसेवक आहेत तेवढेच वार्ड अध्यक्ष असावे अशी जाहीर सूचनाही राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र कुणाला जर फक्त तिकिटासाठी मनसेत प्रवेश करायचा असेल तर त्यांनी येऊ नये असे जाहीर फर्मानही राज ठाकरे यांनी सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नागपुरामध्ये लसीकरणातून भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

