Share

निराधार योजनेपासून निराधार वंचित राहता कामा नये : अब्दुल सत्तार

Published On: 

औरंगाबाद : कोरोनामुळे निराधार योजनेची बैठक होऊ शकली नाही. लवकरच ही बैठक होणार असल्याने जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी ( दि.३० ) सिल्लोड तालुक्यातील भवन, अंधारी आणि भराडी सर्कलचा दौरा केला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत असतांना अब्दुल सत्तार बोलत होते.

मतदार संघातील शेतकरी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निराधार, ज्येष्ठ नागरिक, विधवा अशा पात्र लाभार्थ्यांना आधार देण्यासाठी सरकारच्या वतीने श्रावण बाळ, संजय गांधी अशा योजनेच्या माध्यमातून महिन्याला मानधन देण्यात येते. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या मानधनातून निराधारांना आधार मिळतो. निराधार योजना ही निराधारांचा हक्क असून एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी पात्र लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे अब्दुल सत्तार म्हणाले.

यावेळी कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, संचालक सतीश ताठे , विश्वास दाभाडे, हनिफ मुलतानी, डॉ. दत्ता भवर, परमेश्वर जीवरग, उत्तम शिंदे, भास्कर फुके, पांडुरंग जैवळ, सुभाष लोणकर, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष जाधव यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!