🕒 1 min read
सोलापूर : मागील दोन वर्षे कोरोनाच्या कहरामुळे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली गेली नव्हती. मागील दोन वर्षे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध लादले गेले होते. परंतु आता कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण सोलापुरात मात्र बाबासाहेबांच्या जयंतीच्या उत्सवाला डॉल्बी लावण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बुधवारी आंबेडकरप्रेमींनी रास्ता रोको व धरणे आंदोलन केले. जयंतीच्या आदल्या दिवशी, तणावपूर्ण परिस्थिती दिसून आली. सोलापूर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाचे कारण पुढे करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी लावण्यास मनाई केली.
डॉल्बी लावण्यावर सोलापुरातील आंबेडकरी कार्यकर्ते ठाम होते. डॉल्बीला परवानगी नाकारल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर पार्क चौकात अचानक रास्ता रोको करण्यात आला.
“सर्व नियम हे बाबासाहेबांनी बनवलेले आहेत. सगळ्यांना घटना मान्य आहे. जिल्हा ,उच्चं आणि सर्वोच्च न्यायालये बाबासाहेबांच्या घटनेने निर्माण केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याचे पालन सर्वांनी करायला हवे. कायद्याने बंदी असलेल्या डॉल्बीला परवानगी देता येणार नाही,” असे पोलीस आयुक्त हरीश बैजल म्हणाले आहेत.
- IPL 2022 : जे कोणालाही जमलं नाही ते ‘गब्बर’नं करून दाखवलं; मुंबईविरुद्ध धवननं रचला वर्ल्ड रेकॉर्ड!
- IPL 2022 : “मला वाटलं की…”, मुंबई इंडियन्सच्या सलग पाचव्या पराभवानंतर रोहित काय म्हणाला बघा!
- IPL 2022 : रोहित शर्माला २४ लाखांचा दंड; मुंबई इंडियन्सवर ‘मोठी’ कारवाई!
- सुजात आंबेडकरांची राजकारणात एन्ट्री ?, प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा खुलासा
- इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
