Share

इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले

Published On: 

जालना : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. इंदुरीकर महाराज हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी निघाले असताना हा अपघात झाला आहे.

लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात घडून आला. या अपघातात इंदुरीकर महराज यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ते सुखरूप आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडून आला.

या अपघातात इंदुरीकर महाराज यांचे चालक जखमी झाल्याने पोलिसांनी त्वरित चालकाला परतूर मधील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर इंदुरीकर महाराज यांना पोलिसांनी दुसऱ्या वाहनाने कीर्तनासाठी रवाना केले. .

महत्त्वाच्या बातम्या :

“सगळ्या अपेक्षा राज ठाकरेंकडूनच का?” – तृप्ती देसाई
“घरगुती मुख्यमंत्री अखेर…” ; सदाभाई खोतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला
“अच्छा दिखने के लिये नही,अच्छा बनने के लिये जियो”; संजय राऊत
IPL 2022 MI vs PBKS : पंजाबकडून मुंबईला पराभवाचा ‘पंच’..! पुण्यात विजयी पताका फडकवण्यात रोहितसेनेला अपयश
IPL 2022 : काय तो यॉर्कर…भन्नाटच! पंजाबच्या स्टार फलंदाजाची बुमराहनं उडवली दांडी; पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!