चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली. खेळाडूंचा ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, खेळाडू आऊटडोअर आणि नेटमध्ये सराव करू शकणार आहेत. मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार आहेत. त्यानंतरचे दोन्ही सामने अहमदाबाद इथं होणार आहेत. कसोटी मालिका ८ मार्च रोजी संपणार असून, १२ मार्चपासून टी-२० आणि २३ मार्चपासून वन-डे मालिका खेळविली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पहिल्या २ कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. त्याच बरोबर अनेक माजी खेळाडू सामन्यापूर्वी आपले संभावित ११ खेळाडू निवडत असतात. त्याप्रमाणे माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने देखील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी आपला संभावित ११ खेळाडूंचा भारतीय संघ निवडला आहे.
गौतम गंभीर याने आपल्या संभावित ११ संघात मयंक अगरवाल, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांना वगळले आहे. तसेच सध्या दुखापतग्रस्त असल्याने संघाबाहेर असलेल्या रवींद्र जडेजाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या अक्षर पटेलला त्याने आपल्या संभावित ११ खेळाडूंच्या यादीत समावेश केला आहे. अक्षर पटेल याने अजूनपर्यंत एकही कसोटी सामना नाही खेळला आहे. तरीसुद्धा गंभीर याने अक्षरला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
यामध्ये गंभीरने आपल्या संघात ५ गोलंदाजांना स्थान दिले आहे. तसेच फलंदाज म्हणून शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना निवडले आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून गंभीरने आर अश्विन आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिले आहे. तर गोलंदाजीसाठी कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज याला संघात समाविष्ट केले आहे. हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार आहे की नाही यावर हा प्रश्न अजूनही कायम आहे आणि अक्षर पटेल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी पटेलला त्याने संघात समाविष्ट केले आहे. त्यामुळे गौतम गंभीरचा संभावित ११ जणांचा खेळाडू संघ शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. असा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेवासे तालुक्यातील रस्त्यांना ‘शंभर कोटी’चा निधी, नेवासा -शेवगाव रस्त्याची साडेसाती सुटणार
- कैद्यांचे बनावट जामीनपत्र कारागृहाच्या पेटीत
- आगामी कसोटी सामन्यातील भारताच्या कामगिरीवर इंग्लंडच्या दिग्गजाचे भाष्य !
- मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू होणार
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हे शिवसेनेचे ढोंग; संजय निरूपमांचा टोला


