Share

Rahul Narvekar । “पिठासीन अधिकारी म्हणून… “; शिंदे – ठाकरे यांच्यातील संघर्षावर नार्वेकरांच मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

Rahul Narvekar । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. यानंतर याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शिवेसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह, पक्षवर्चस्व, १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरील आक्षेप या सर्व प्रकरणांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही युक्तिवाद झाला. यावेळी न्यायाधीश कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असतो, त्यामुळे तो पक्षाच्या भूमिकेतूनच निर्णय घेत असतो. अस वक्तव्य न्यायाधीशांनी केले. या सत्तासंघर्षावर आता राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले कि, बंडखोर १६ आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर कायद्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले आहे. तसेच पुढे ते म्हणाले कि, विधिमंडळात कामकाज कसं चालवायचं, काय निर्णय घ्यायचे याबाबतचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांचे असतात. त्यामुळे पिठासीन अधिकारी म्हणून जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा सभागृहाचे काम व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी जे निर्णय घेणे आवश्यक असतात ते निर्णय प्रथा परंपरेनुसार आम्ही घेत असतो. त्यामुळे कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!