मुंबई: बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरा पासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. संजय राठोड यांच्या ओडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. ‘संजय राठोड हे माझ्या संपर्कात आहेत. यवतमाळमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये संदर्भात माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.’ असं अजित पवार यांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी पोलीस याबाबत संपूर्ण चौकशी करत आहेत. त्यांना त्यांचं काम करु द्यात. सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईलच, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवारांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यायचा जरी ठरवला तरी, ते अजित पवारांना विचारणार आहेत का? असं म्हणत पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्व वाढून घ्यायची सवय आहे, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.
अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्याच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार काय? उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यायचा ठरवला तरी ते अजित पवारांना विचारणार आहे का किंवा ते स्वतः शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात का? पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्त्व वाढून घ्यायची सवय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 18, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- मुबलक वाळुसाठा नसतांना पैठण तालुका प्रशासनाचा लिलावाचा बनाव !
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी


