Share

मुबलक वाळुसाठा नसतांना पैठण तालुका प्रशासनाचा लिलावाचा बनाव !

Published On: 

पैठण : तालुक्यातील हिरडपुरी येथे मुबलक प्रमाणात वाळुसाठा नसतांना केवळ कागदावर वाळुसाठा असल्याचा दाखवत तालुका प्रशासनाने या ठिकाणचा वाळुसाठा लिलावाचा घाट घातला आहे. या बद्दल ठेकेदार दबक्या आवाजात लिलाव रद्द करण्याची मागणी करत आहे.

उपविभागीय आधिकारी यांच्याकडून तालुका प्रशासनाला मिळालेल्या आधिकारानुसार तालुका प्रशासनाने शहरातील पोलिस ठाण्यातील एक व हिरडपुरी येथील दोन असे तीन वाळुसाठ्याचे लिलाव नुकतेच केले आहे, हिरडपुरी येथील एक वाळुसाठा ११० ब्रासचा दाखवला तर दुसरा १३० ब्रासचा पण प्रत्यक्षात या ठिकाणी कमी वाळू साठा असल्याची चर्चा आहे. गोदावरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला व गोदाकाठी असे मिळुन एकंदर साठ ते सत्तर ब्रास वाळुसाठा आल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.

या ठिकाणी जर साठ ते सत्तर ब्रास वाळुसाठा आजच्या तारखेला शिल्लक असेल तर उर्वरीत वाळु ठेकेदाराला देणार कुठून ? असा प्रश्न काही ठेकेदार या ठिकाणी उपस्थीत करीत आहे,  वाळुसाठा केवळ कागदावर दाखवण्यात आला असुन प्रत्यक्षात वाळुसाठा हा गंगेतुन उपसला जाणार असल्याची भीती ठेकेदारांनी उपस्थित केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!