मुंबई: दिल्लीत एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी गेले असता भाजपने यावरूनही काँग्रेसवर निशाना साधण्यास सुरुवात केली. आता यावरूनच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘बलात्काराला पक्ष असतो का’? असा सवाल सामनातून केंद्राला केला आहे. त्यामुळे यावरून राजकरण चांगलेच रंगले आहे.
राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे. असे सामनातून म्हटले गेले आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ‘निर्भया कांड’ झाले. एका तरुण मुलीवर बसमध्ये बलात्कार करून तिला फेकण्यात आले. तेव्हा भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह देशभरात महिलांवरील अत्याचाराबाबत त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारला जबाबदार ठरवले. दिल्लीचे रस्ते जाम केले व संसदेचे काम चालू दिले नाही. आज नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. राहुल गांधींसह अनेक नेते पीडितेच्या माता-पित्याच्या सांत्वनासाठी भेटायला नांगलरायला जात आहेत. भाजपला हे सर्व पटत नाही व ढोंग वाटते. अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे.
राहुल गांधी तेथे गेले. त्या मुलीची अभागी माता राहुल गांधी यांच्या छातीवर डोके ठेवून आक्रोश करीत असल्याचे चित्र दिल्लीतील मीडियाने ठळकपणे छापले. हे छायाचित्र गांधी यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वर प्रसिद्ध केले. आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने या छायाचित्रालाच आक्षेप घेतला. आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले व राहुल गांधींचा हा फोटो हटविण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता नऊ वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबास भेटतो. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतो. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? अन्याय पीडितेचा आक्रोश व्यक्त करायचा नाही अशी लोकशाही व स्वातंत्र्याची नवीन व्याख्या कोणी बनवू पाहात असेल तर तसे स्पष्ट सांगावे. असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. केंद्र सरकार संवेदनशील नाही व गंभीरही नाही.असे सामनातून म्हटले गेले आहे.
एका बाजूला त्या अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा, हत्येचा धिक्कार सुरू आहे.दुसरीकडे लखनऊच्या रस्त्यावर एका बेफाम झालेल्या मुलीने टॅक्सीचालकास ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली ते चित्र धक्कादायक होते.त्याच वेळी लखनऊच्या मुलीच्या अटकेची मागणी सुरू झाली. स्त्रीची ही दोन रूपे आपल्याच देशात आहेत. राहुल गांधी हे बलात्कारपीडितेच्या कुटुंबांना भेटले तो फोटो ट्विटरवरून हटवा, अशी मागणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने केली. मग बलात्कारपीडित निर्भयाच्या माता-पित्यांना तेव्हा नरेंद्र मोदीही भेटलेच होते. त्या फोटोला राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. हे असे आणखी किती काळ चालायचे? असा सवाल संजय राऊत यांनी सामनातून केंद्राला केला आहे.
महत्त्वच्या बातम्या
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट
- बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्यालाच; खंडपीठाचा हस्तक्षेपास नकार


