मुंबई – महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या वर्धापन दिनी काँग्रेसला फटाकरले होते. आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य करण्यात आलं असून चांगलेच खडेबोल कॉंग्रेसला सुनावण्यात आले आहेत.
‘शिवसेनेकडे आत्मबळ आणि स्वबळ आहे. स्वबळ हा शिवसेनेचा हक्क आहे. निवडणुका आल्या की फक्त स्वबळाची भाषा करायची हे बरोबर नाही. मग प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढण्याची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युती तेव्हाही शतप्रतिशत भाजप हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळं एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना कॉंग्रेसमध्येच स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची का? हा निर्णय हायकामंड घेणार आहे. निवडणुकीला वेळ असून आता हा विषयच नाही असे त्यांनी म्हटले आहे.
2023 च्या निवडणुकीत आम्ही एकटे लढू की आघाडी होईल हा निर्णय हायकामांड घेईल. ही वेळ हा निर्णय घ्यायचा नाही. कॉंग्रेस आपला निर्णय 2023 च्या शेवटी होईल अजून त्याचा प्रस्ताव नाही. याबाबत आता विचार करायची वेळ नाही आणि हा निर्णय हायकामांड घेईल असेही पाटील यावेळी म्हणाले. पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस पक्षात एकवाक्यता नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस पक्षातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. जर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय हायकमांड घेणार असेल तर पटोले हे महाराष्ट्रभर फिरून आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल का करत आहेत असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे. याशिवाय कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा देवून देखील शिवसेना-राष्ट्रवादीने या इशाऱ्याला गांभीर्याने न घेतल्याने कॉंग्रेसने तलवार म्यान केली आहे का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

