नागपूर: राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. एसटी कामगारांचे आंदोलन आणि त्यातच अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार, यामुळे राजकारण चांगलेच तापत आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात याच मुद्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमरावती हिंसचारासाठी दोषी ठरवले आहे तर दुसरी कडे भाजप हिंसाचार झाला म्हणून आता आंदोलने करत आहेत.
एकंदरीतच राज्याची राजकीय स्थिती अत्यंत वाईट असल्याचे चित्र दिसत आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांचे सत्ता गेल्यापासून वागणे विरोधी पक्षासारखे नाही तर महाराष्ट्र विरोधी पक्षासारखे असल्याचे टीका कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. राज्यातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती शहरात झालेले प्रकार चिंतेचा विषय असून राज्य सरकारने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?:
अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे.
1/2
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 22, 2021
भाजपवर टीका करताना कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपला गुजरात प्रमाणेच महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भाजपकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजप राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- …म्हणून परमबीर सिंग लपून बसले आहेत; वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद
- …म्हणून देशाने गेल्या ७५ वर्षांत हवी तेवढी प्रगती केली नाही- मोहन भागवत


