Share

आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का? त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही !

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना वादात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील उडी घेतल्याचे दिसून आले होते. कंगनाच्या कार्यालयावर तोडकाम केल्यानंतर रामदास आठवले यांनी तिची भेट घेऊन अन्यायाविरुद्ध तिचे समर्थन केले होते.

आता, अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात गैरकृत्याची तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या समर्थनार्थ काल भेट घेऊन रिपब्लिक पक्षसोबत असल्याचे सांगितले होते. मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. येत्या सात दिवसांत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांच्यावर कोणती कारवाई केली नाहीतर मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.

याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काही पत्रकारांनी प्रश्न केला असता, “त्यांचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात त्याच कोणी गांभीर्याने घेत नाही. सभागृहातही नाही आणि बाहेरही नाही” अशी बोचरी टीका त्यांनी रामदास आठवलेंवर केली आहे.

अभिनेत्री पायल घोषसह रामदास आठवले राज्यपालांच्या भेटीला!

आज रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.रामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंह कोश्यारी यांनी जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी मी याबाबत गृहमंत्र्यांशी बोलतो, असं सांगितलं आहे.

“राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे,” असे रामदास आठवले यांनी सांगितले. तर, “तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल,” असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!