Share

‘उद्योग व्यवसाय प.बंगलला देऊन महाराष्ट्रातील तरुणांना वडापाव विकायला लावता का?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) या तीन दिवस मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यावर भाजपा नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत टीका केली आहे.

शेलार ट्विट करत म्हणाले, ‘ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय… पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण महाराष्ट्रातील उद्योगांना, दिदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का? म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?,’ असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.

‘नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली, यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना? विरोधकांना चिरडणाऱ्या ‘बंगाली हिंसेचे’ धडे तर गिरवले जात नाही ना?,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी!,’ अशी मागणी आशिष शेलार यांनी केली असून सरकार या भेटीतील चर्चा का लपवते? असा सवाल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!