Share

भ्रष्टाचार करण्यासाठी या नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का?; सोमय्यांचा शरद पवारांना कडवा सवाल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी महाविकास आघाडीला चांगलंच धारेवर धरलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमय्या यांनी तिखट सवाल केला आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी या नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का?, असा कडवा सवाल यावेळी शरद पवारांना केला आहे.

शरद पवार सर्टिफिकेट देतात की, ईडी अतिक्रमण करतंय, ईडी हैराण करतंय. भावना गवळी निर्दोष आहेत. माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे की, खासदार भावना गवळींनी एकूण २५ कोटी रुपयांची कॅश काढली आहे. आणि शरद पवार सांगतात ईडी का चौकशी करतंय? तुम्ही मंत्री असताना ईडीचा कायदा तुम्हीच केला होता. मुद्दा कोण चौकशी करतं हा नाही पण भावना गवळींनी ५५ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, ५५ कोटी रुपये ढापले आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणारा कारखाना त्यांनी त्यांच्याच कंपनीला हा कारखाना २५ लाखामध्ये विकला. तुम्हाला हे ५५ कोटी दिसत नाहीत? की आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करता?, असा सवाल यावेळी शरद पवारांना विचारला आहे.

भावना गवळी प्रकरणाची आम्ही तक्रार केल्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. राज्य सरकराने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली आणि २१ दिवसांच्या आत ही समिती बरखास्त केली. हेच पवार साहेबांचे मार्गदर्शन आहे का?, असा सवाल करत सोमय्या यांनी शरद पवारांवर बरसले आहेत. दरम्यान, ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासूनच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतील नेत्यांविरोधात मोहीम चालू केली होती. अनिल परब, मिलिंद नार्वेकरांसह महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, तक्रारी दाखल करणं हे सुरूच होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!