पुणे : भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आज पत्रकार परिषेद देखील घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात आहे. असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिलेली आहे.
दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू असून, या चौकशीचे धागेदोरे तासगावपर्यंत पोहोचले आहेत. मंत्री परब यांचे खासगी सचिव आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे साडेसातशे कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता अनिल परब हे अडचणीत सापडले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. १०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. त्यामुळे ते देखील चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या नेमेके कोणत्या अनिलच्या शोधात आहेत ?असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनील गावसकर यांनी व्यक्त केली भीती; धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- स्थानिक पातळ्यांवर अजूनही महाविकास आघाडीत बिघाडी? खुद्द अजित पवारच म्हणाले…
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

