जालना : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते.
राज्यातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या भेसळ व काळ्या बाजारात मोठी वाढ झाली आहे. अव्वाच्या सव्वा दर उकळून भेसळयुक्त रेमडेसिवीर पुरवले जात असल्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आता, राज्य सरकारने हे गैरप्रकार रोखण्यासाठी व रेमडेसिवीरचा योग्य पुरवठा होण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फक्त रुग्णालयांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले जाईल असा सूचना याआधीच आरोग्य मंत्र्यांनी दिल्या होत्या. मात्र, तरीदेखील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण सांगून अनेक रुग्णालये नातेवाईकांनाच इंजेक्शनची जुळवा जुळव करावी लागत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
यामुळेच, रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानेच या इंजेक्शनचा पुरवठा करावा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. राजेश टोपे यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला या सूचना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशातील कोरोनाच्या विध्वंसाला निवडणूक आयोगच जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा’
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- पंतने ‘या’ कृतीमुळे जिंकले सर्वांचे मन : पहा व्हिडीओ
- लसीच्या किंमती एकच ठेवा, नफा कमावण्याची ही वेळ नाही : केजरीवाल


