🕒 1 min read
मुंबई : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात राजकीय फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर सोमवारी हजर झाले. त्यानंतर १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. देशमुखांच्या अटकेला काही तास उलटत नाही तोपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने अजित पवारांच्या ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिलेत.
अजित पवारांवर झालेल्या कारवाईवरून शिवसेना नेत संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत भाजपावर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘मला आज कळालं की अजित पवारांच्याही मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. पण मला एक कळत नाही. भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? त्यांनी काय सगळे टॅक्स भरलेत का? ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत यामागचं खरं कारण सर्वांना माहित आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका.’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
तसेच ‘देशमुखांवर आरोप करणारे जे लोकं आहेत ते आरोप करून पळून गेले नाही. त्यांना पळवून लावले आहे. पळून जाणारा व्यक्ती केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. पोलीस खात्याचा आयुक्त असलेला अधिकारी हा देश सोडून जातो. तेव्हा केंद्रीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्याने आरोप केला आणि पळून गेला. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते. चौकशी होऊ शकते. तपास होऊ शकतो. पण मला वाटतं हे सर्व ठरवून चाललं आहे. महाविकास आघाडीतील जे प्रमुख लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचा आणि बदनामी केली जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक


