Share

दिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू

Published On: 

🕒 1 min read

पाकातले बेसन लाडू– बेसन लाडू हा लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वांचा आवडा पदार्थ आहे. बेसन लाडू करीता जास्त सामान लागत नाही. बाकीच्या पदार्थांच्या तुलनेत कमी वेळ लागतो. बेसन लाडूचे दोन प्रकार पडतात एक पाकातले बेसन लाडू व साधे बेसन लाडू आज आपण पाकातले बेसन लाडू पाहणार आहोत.
साहित्य:
१ वाटी बेसन
१/२ वाटी साजूक तूप
पाऊण वाटी साखर
अर्धी वाटी पाणी
वेलची पूड
बेदाणे

कृती:
१) तूप पातेल्यात गरम करावे त्यात बेसन घालून मध्यम आचेवर खमंग भाजावे. बेसन गॅसवरून उतरवावे.
२) पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवावे व त्याचा एकतारी पाक करावा.
३) तयार झालेला पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात घालून ढवळावे. ढवळताना बेसनाची गोळी होण्याची शक्यता असते. त्याची काळजी घ्यावी.
४) हळूहळू पाक बेसनात मुरतो. मध्येमध्ये मिश्रण ढवळत राहावे. मिश्रणात वेलची पूड घालावी.मिश्रण थोडे घट्टसर झाले कि लाडू वळावेत. लाडू वळताना त्यावर एक एक बेदाणा लावावा.

टीप :
१) वरील कृतीमध्ये तूप बेताचेच घातले असल्याने मिश्रण पटकन आळते त्यामुळे मिश्रणावर लक्ष ठेवावे. मिश्रण जास्त आळले तर लाडू वळता येत नाहीत.

pakatle besan ladoo
पाकातले बेसन लाडू

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!