Share

दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या वड्या

Published On: 

🕒 1 min read

ओल्या नारळाच्या वड्या – नारळ  हा असा घटक आहे जो नेहमी घरात उपलब्ध असतो. सण असो वा उत्सव नारळ देवाला फोडला जातो. नारळापासून अनेक पदार्थ बनविले जातात पण नारळाच्या वड्या सर्वात जास्त आवडीने खाल्या जातात. जाणून घेऊ या ओल्या नारळाच्या वड्याची रेसिपी.

साहित्य:
१ नारळ
३५० ग्रॅम साखर
तूप
वेलची पूड

कृती :
१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये.
२) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.
३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा.
४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर ढवळत राहावे.
५) छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.
६) एका परातीला तूप लावून घ्यावे आणि मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान पसरावे. अर्ध्या इंचाचा थर करावा.
७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. नाहीतर मिश्रण थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत.
८) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.

olya naralachya-vadya.,diwali speical,food
ओल्या नारळाची बर्फी

टिप:
१) वड्यांना केशरी रंग हवा असल्यास थोडे केशर किंवा खायचा केशरी रंग घालू शकतो.
२) जर आंब्याचा रस उपलब्ध असेल तर साखर घालताना थोडी साखर कमी करून थोडा आंबा रस घालावा. नारळ आणि आंबा एकत्र स्वाद अप्रतिम लागतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!