Share

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, भाजपा करणार चुन भाकर आंदोलन

Published On: 

अमरावती : महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे.

शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठलं भाकर देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा व भाजपा किसान मोर्चा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 नोव्हेंबरला शेतकरी धरणे देतील, चुन भाकर खातील आणि तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देतील.
या आंदोलनाद्वारे सरकारकडे खालील मागण्या केल्या जातील –

१) महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबाग झालेल्या नुकसानभरपाई सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहुला 25 हजार व बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी. तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये. कापसाची बोंडअळी बोंडसळी, सोयाबीन, धानाचे झालेले नुकसान, संत्र्यांची फळगळती याकरिता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.

२) केंद्राच्या MSP कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र मुबलक प्रमाणात सुरु करावीत व दिवाळीतही खरेदी सुरु ठेवावी.

३) यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.

४) हवामानवर आधारित फळ पीक विमा योजनेचे महाराष्ट्र सरकारने बदललेले निकष अन्यायकारक असून फक्त विमा कंपन्याच्या फायद्याचे आहेत. संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विमाचे बदललेले निकष त्वरित रद्द करून जुने 2018-19 चे निकष कायम करण्यात यावे.

५) किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.

६) सध्या कृषी पंपाचे वितरण मार्च 2018 नंतर संपूर्णत: बंद आहे. ट्रान्सफार्मर जळला तरी नादुरुस्त ट्रान्सफार्मर 24 तासात देऊन दिवसा किमान वीजपुरवठा द्या.

७) रासायनिक खते, बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.

८) कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.

या सर्व मागण्यांकरिता भारतीय जनता पार्टी 13 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आंदोलन करणार आहे. तरी ह्या आंदोलनात सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!