औरंगाबाद : मराठवाड्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. याआधीही नोटिसा देण्यात आल्या होत्या, परंतु तरीही जि.प.कडून विहिरींबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
मराठवाड्यात उन्हाळ्यातील टंचाई उपाययोजनेमध्ये होणारा कोट्यवधी रुपयांच्या खर्चात बचत करण्यासाठी विभागीय आयुक्त आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्येक जिल्ह्यात किमान ६०० सार्वजनिक सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सिंचन विहिरी टंचाईग्रस्त गावांमध्ये घेऊन त्याद्वारे पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. या विहिरींची कामे मे २०२१ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत कळवण्यात आले होते.
मात्र मार्च महिन्यात विभागीय आयुक्तांनी केलेल्या पाहणीमध्ये सर्वच जिल्ह्यांची प्रगती असमाधानकारक होती. त्यामुळे आठही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवून त्यांना या कामाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. या विहिरीवरून गावात उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांनी या कामांकडे लक्ष दिलेच नाही. त्यामुळे मार्च महिना व मे महिन्यातील विहिरीच्या कामांमध्ये फारसा फरक पडलाच नाही. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता दिलेल्या ६३२ विहिरींपैकी २९४ कामे सुरू असून ३९ कामेच पूर्ण झाली आहेत. या प्रकारामुळे विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आता दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. कामे तातडीने पूर्ण करावीत अन्यथा प्रशासकीय कारवाईचा इशारा नोटिसींद्वारे देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आठ कामांनाच कुशल निधी प्राप्त झाला आहे. जालना ११५, परभणी २८, हिंगोली ३६, नांदेड ७, लातूर ४६, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात एकाही कामाला कुशल निधी प्राप्त झाला नाही. त्यावरूनही आयुक्त केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
