Share

वंचित बहूजन आघाडीला कोल्हापुरात धक्का; दिग्गज नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

कागल – सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा महासचिव डॉ. आनंद गुरव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.गुरव यांनी 2019 मध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी लक्षवेधी मते घेतली होती. त्यामुळे वंचित बहूजन आघाडीला कोल्हापुरात चांगलाच धक्का बसला आहे असं सांगितले जात आहे.

कोल्हापूर येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले.  यावेळी जिल्हाध्यक्ष घाटगे म्हणाले, डॉ. गुरव यांनी सर्वसामान्य जनतेला विविध शासकीय योजना व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मोठ्या अपेक्षेने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्या पूर्णत्वास जातील. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल. दलित व मागासवर्गीय समाजामध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार व कार्य रूजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत . त्यांच्या पाठीशी पक्ष व व्यकिगत मी खंबीरपणे नेहमीच उभा आहे .

यावेळी डॉ. आनंद गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील यांच्यासह  गुरव यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजे समरजितसिंह घाटगे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील यांच्यासह अनेकांनी यावेळी हजेरी लावली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!