औरंगाबाद : भरगच्च प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस पडते. ते रिक्षाचालकाला थांबवून रिक्षाची पाहणी करतात. त्यात तब्बल आठ प्रवासी असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी त्या रिक्षासह रिक्षाचालकावर कारवाई करतात. थेट जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याचे काम करावे लागत असेल तर मग वाळूज वाहतूक शाखेचे अधिकारी काय करतात? नेमके ‘कोणत्या’ गोष्टीमुळे कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजाबदार रिक्षा चालकांना पोलीस अभय देत आहेत? असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन होत असलेले पाहूनही डोळेझाक करणाऱ्या वाळूज वाहतूक शाखेवर कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
वाळूज येथे पाहणी करून परततांना बाजाजगेट समोरून एक रिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन, जात असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या रिक्षाचालकाला थांबवत झाडाझडती घेतली. त्यात तब्बल आठ प्रवासी निघाले. आणि रिक्षा कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आली. रिक्षात फक्त दोन प्रवाश्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. याची अमंलबजावणी करण्यासाठी चौका चौकात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शिवाय वाहतुक शाखेचे कर्मचारी कर्तव्यावर असतांना रिक्षात जर सात ते आठ प्रवाशी प्रवास करत असतील तर कर्तव्यावरील पोलीसांच्या कामावर शंका निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे या परीसरासाठी स्वतंत्र वाहतुक शाखा कार्यरत आहे. पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी यांना रिक्षावर कार्यवाही करण्याची वेळ येत असेल तर यासाठी जबाबदार असणाऱ्या वाळूज वाहतुक शाखेतील अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये असा प्रश्न उपस्थित होतोय. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देवून कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय.
मग स्वतंत्र वाहतूक शाखा कशाला?
वाळूज औद्योगिक परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून शासनाची मान्यता नसतानाही तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत वाळूज वाहतुक शाखेचे कार्यालय थाटले. मात्र, स्वतंत्र वाळूज वाहतुक शाखेकडून औद्योगिक परीसरातील वाहतूक सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नेहमी दिसते. बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जागोजागी नाकाबंदी करून उभे असलेले पोलीस देखील अशा रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच कोरोना संसर्ग आणखी पसरण्याची भीती आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

