अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा नगर जिल्ह्यालाही जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी तातडीने पंचनामे करून घ्यावेत.
पंचनाम्याच्या त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी व आपले काम गुणवत्तापूर्ण करावे, असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. भोसले यांनी अकोले तालुक्यातील करंडी गावाला भेट दिली. तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधला.
नूतन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यावेळी म्हणाले की, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील अकोले तालुका दुर्गम भागापैकी आहे. आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे.
अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पिकाचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही. प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मदत मिळेल. यासाठी परस्पर समन्वय ठेवून त्रुटी न ठेवता गुणवत्तापूर्ण गतीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.
आमदार किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा दोघांनीही विविध कार्यक्रमातून व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात अकोले तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याबाबत भोसले यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लग्न संस्थेवर विश्वास नाही, लग्नासाठी सीमा असू नयेत – राधिका आपटे
- पोलंड मधील व्रोकला शहरात आता ‘हरिवंश राय बच्चन’ चौक !
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- अहो,हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा कळणार नाही : रामदास आठवले
- संजय राऊत काय माणूस आहे ? कसं आणि काय बोलतो हे त्याला तरी कळतं का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

