मुंबई: आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनय आणि स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री राधिका आपटे हिचा नुकताच एक व्हिडिओ आला त्यामध्ये तिने 2012 मध्ये लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. राधिकाला अनेकवेळा तिने हे लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले असा प्रश्न विचारण्यात आला ? अखेर याचं खरं कारण तिने सांगितलं.
राधिका म्हणाली 2012 मध्ये तिला इंग्लंडचा सहज व्हिसाची आवश्यकता होती. त्यावेळी इंग्लंडचा व्हिसा मिळणं खूप कठीण होते म्हणून तिने संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले.राधिका आपटेने विक्रांत मॅस्सी सोबत नुकताच झालेल्या व्हिडिओ चॅट दरम्यान ही गोष्ट सांगितली. राधिका सध्या आपल्या पतीसोबत लंडनमध्ये आहे. राधिकाचे हे उत्तर ऐकून तिचे फॅन्सना नक्कीच धक्का बसू शकतो. राधिका पुढे म्हणाली, तिचा लग्न या संस्थेवर विश्वास नाही. ती म्हणाली, जेव्हा मला समजले की लग्न केल्यामुळे सहजपणे व्हिसा मिळू शकतो, तेव्हा मला वाटले की लग्नासाठी कोणत्याच सीमा असू नयेत.
राधिकाने आजवर मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील सिनेमा, वेबसीरिज आणि लघुपटात काम केल्यानंतर आता ती हॉलिवूड सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा तिने स्वतः इंस्टाग्रामवर केली आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘अ कॉल टू स्पाय’. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ कॉल टू स्पाय सिनेमा आयएफसी फिल्मने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रकाश आंबेडकरही घेणार ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा
- मिर्झापूर वेब सिरीज मुळे जिल्ह्याची बदनामी- अनुप्रिया पटेल
- ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा’ चित्रपटातून ‘बहिर्जी नाईकांच्या चरित्राला उजाळा
- डॉक्टरांची मेहनत फळाला आली; कपिल देव यांना मिळाला डिस्चार्ज
- ‘लालूंनी जादूटोण्याच्या सहाय्याने मला मारण्याचा प्रयत्न केला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

