Share

जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवेंनीही केला स्वबळाचा दावा, हीच शिवसैनिकांची भूमिका!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा देत आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी देखील स्वबळाचा उल्लेख करत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. राज्यात सुरू असलेली शिवसंपर्क मोहिम देखील त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. या मोहिमेनिमित्त औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीही स्वबळाचा नारा दिलाय. शिवसंपर्क मोहिमेनिमित्त वैजापूर तालुक्यातील हिंगोणी इथल्या बैठकीत ते बोलत होते.

प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेचे स्वबळ वाढले पाहिजे. सर्व जातीधर्मातील लोक आपल्या कार्यकारणीमध्ये असले पाहिजे, ही भूमिका सर्व शिवसैनिकांची असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. ती पार पाडत असताना लहान लहान केलेल्या विकासकामाची मोठी प्रसिद्धी झाली पाहिजे. रिकामे श्रेय आपल्याला नको आहे. आपली शिवसेना ही एक परिवार असून कुटुंबासारखी काम करते. त्यामुळे सद्भावणेने शिवसैनिकाने काम करावे. अडलेल्यांना प्राधान्याने मदत करून पक्ष निष्ठेने शिवसैनिकाने सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे.’

शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते ३१ जुलै दरम्यान राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात वैजापूर तालुक्यातील गोळवाडी, भगूर, लासुर, हिंगोणी, भग्गाव, या गावातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखा प्रमुख नियुक्त्या, बुथ रचना ,बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेण्यात आला.

संघटनेची पुनर्रचना करा : संघटनेत सक्रियता असली पाहिजे, काम करण्याची नियत असली पाहिजे, प्रत्येक कामात सातत्य असले पाहिजे. प्रत्येक प्रभागाचा एक शाखाप्रमुख असला पाहिजे हे या शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचे उद्दिष्टे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात शिवसेनेचे स्वबळाचे हे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी ताकदीने काम करावे, संघटनेची पुनर्रचना करावी. असे आवाहन जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!