Share

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन ; पंकजा मुंडेंच्या १२० कार्यकर्त्यांसह ४३ नेत्यांवर गुन्हे दाखल

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक पंकजा मुंडे समर्थक नाराज होते. याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचेही वृत्त होते. यानंतर काल पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला.

परंतु यावेळी यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. शिवाय सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळता विनामास्क सभा आयोजित केली. तसेच त्याठिकाणी उपस्थित राहिले म्हणून वरळी पोलीस पोलीस उपनिरिक्षक प्रदीप सोनावणे यांच्या फिर्यादीवरुन वरळी पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यात ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांना ताब्यात घेत नोटीस देत सोडून देण्यात आले आहेत. आयोजक तसेच सभेत उपस्थित असलेल्या सर्वाविरोधात हा गुन्हा दाखल असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल कोळी यांनी सांगितले आहे.

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाबाहेर बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर, अहमदनगर अशा विविध भागातून अनेक कार्यकर्ते, राजकीय नेते येथे दाखल झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करत आपली भूमिका मांडली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!