मुंबई: सध्या मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील महावीकस आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली जात आहे. भाजप पक्षाचा रोख ठाकरे सरकारवर असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असं विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं. त्याच सोबत त्यांनी विधानसभा विसर्जित करून पुन्हा निवडणूक लढवा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असं म्हणत सी. टी. रवी यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपला जास्त मतदान केलं आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला आणि सत्तेत येण्यासाठी महावीकस आघाडी सरकार स्थापन केली.
शिवसेनेनी २०१९ च्या निवडणुकांच्या वेळी भाजपच्या नावाने मत गोळा केले आणि शेवटी लोकांनी दिलेला कौल नाकारत सत्ता स्थापन केली. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
- सत्ता कधी येणार विचारणं बंद करा; चंद्रकांत पाटलांनी सुनावले कार्यकर्त्यांना खडेबोल
- अर्जुनचा ‘थ्री मंकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘मनी हाईस्ट’ च्या हिंदी रिमेकचा फर्स्ट लूक व्हायरल
- रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; कोल्हेंचा गोखलेंना सवाल
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाचा हात- चंद्रकांत पाटील
- आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारला काळे झेंडे दाखवून निदर्शने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

