मुंबई : महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर सर्व रखडलेल्या चित्रपटांच्या रिलिज डेटची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे अभिनेता अर्जून रामपालचा आगामी प्रोजेक्ट चर्चेत आला आहे. मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट ‘थ्री मंकी’चा फर्स्ट लुक त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल ‘इंडियन प्रोफेसर’च्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट ‘मनी हाईस्ट’ या प्रसिद्ध स्पॅनिश मालिकेचे भारतीय रूपांतर असल्यामुळे हा प्रकल्प बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अर्जुनने त्याच्या ‘थ्री मंकी’चा फर्स्ट लुक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अर्जुन रामपालने त्याच्या इंस्टाग्राम त्याचा अर्धा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने ब्राऊन जॅकेट आणि पांढरा शर्ट घातला आहे. या फोटोत त्याच्या मागे कॅमेरा आणि लाईट दिसत आहेत. हा फोटो त्याच्या बहुप्रतिक्षित आगामी प्रोजेक्टच्या शूटचा आहे. ‘थ्री मंकीज’मधील अर्जुन रामपालचा हा फर्स्ट लूक असल्याची सर्वत्र चर्चा आहे. ही पोस्ट शेअर करत अर्जुनने कॅप्शनमध्ये ‘लाइट्स कॅमेरा अॅक्शन. पुन्हा सेटवर. एका प्रवासाची सुरुवात’ असे लिहिले आहे. त्याने या पोस्टसोबत हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
https://www.instagram.com/p/CWSPu8dtDty/?utm_medium=copy_link
या फोटोवर अर्जुनची गर्लफ्रेन्ड, मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने एक इमोजी टाकला आहे. ‘देसी प्रोफेसर’ म्हणत या लूकमध्ये खूप पसंत केले जात आहे. ‘थ्री मंकीज’चे दिग्दर्शन अब्बास अलीभाई बर्मावाला आणि मस्तान अलीभाई बर्मावाला करणार आहेत. पाच वर्षानंतर या चित्रपट निर्मात्या जोडीचे दिग्दर्शनात पुनरागमन होणार आहे. आता या आगामी चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी पटोलेंनी ‘ते’ वक्तव्य केले-संजय कुटे
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला


