Share

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाचा हात- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीला संबोधित करतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपाचा हात असल्याचे मान्य केले आहे.

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की,’एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या सर्व संघटना बरखास्त झाल्या आणि सर्व नेतृत्व भाजपाकडे आले. त्यावर असह्य होऊन अवघड स्थिती झाल्यानं संजय राऊत वारंवार यात भाजपाचा हात असल्याचं म्हणत आहेत. कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही.’ तसेच एसटी कर्मचाऱ्यांची खूप भीषण स्थिती आहे. या बैठकीत आपल्याला या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काय करायचं याचाही निर्णय करावा लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांन पाठिंबा म्हणून आपण ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलो. आपले दोन नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर गेल्या आठवडाभर एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सदाभाऊ खोत वाढलेली दाढी घेऊन आले तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले का? एसटी कर्मचाऱ्यांच्या गावागावातून मागण्या आहेत की गोपीचंद पडळकरांना पाठवा, सदाभाऊ खोतांना पाठवा. ते त्यांच्या कुठल्याही युनियन लिडरचं नाव घ्यायला तयार नाही. कारण त्यांना सर्वांनी फसवलं आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!